Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Beed News : मुख्यमंत्री साहेब, आम्हाला अधिकारी व्हायचंय, आम्हाला शिक्षक द्या

Beed News

बीडच्या हिवरा पहाडी आदर्श जिल्हा परिषद शाळेतील मुलीची रिपोर्टीग

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – मुख्यमंत्री साहेब आम्ही मेहनत घेतो, तुम्ही फक्त शिकवण्यासाठी शिक्षक द्या, आम्हाला शिकायचे आहे, मोठे अधिकारी व्हायचे आहे, असे म्हणत हातात बाटली घेऊन स्वतः रिपोर्टिंग करत विद्यार्थिनींनी आपल्या शाळेतील अडचणी मांडत शाळेतील समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आर्त हाक दिली आहे. बीड जिल्ह्यातील (Beed News) हिवरा पहाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विद्यार्थिनी शाळेत शिक्षक देण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? : ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा! – सविस्तर बातमी 

बीड तालुक्यातील हिवरा पहाडी गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद गेली अनेक दिवसांपासून शाळेत गणित, विज्ञान आणि संगणक या विषयांसाठी शिक्षक नसल्याची तक्रार करत स्वतः रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांकडे शिक्षक देण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले विद्यार्थी

(Beed News) आम्हाला अधिकारी व्हायचे आहे, मात्र शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. आमचे आई वडील ऊसतोडी करतात, आमचे गाव दुर्गम भागात आहे. तरी लवकरात लवकर शिक्षक द्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

विद्यार्थिनींनी केलेला रिपोर्टिंगचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रचंड वेगाने व्हायरल होत असल्यामुळे या व्हायरल व्हिडिओला पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून पालक वर्ग आणि नागरिकांकडून लवकरात लवकर हिवरा पहाडी जिल्हा परिषद Beed News शाळेसाठी विविध विषयांसाठी शिक्षक उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×