Breking News
तडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबित

पुण्यात बुलेट रायडरांना मस्ती करणे भोवले

५ जणांवर गुन्हा, चार दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात मॉडीफाईड वाहनांचा वापर करीत नागरिकांना मनस्ताप देणार्‍या रायडरविरूद्ध पोलिसांनी मोहिम हाती घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी बेशिस्त दुचाकीस्वारांसह ‘मध्यरात्री बुलेट सायलेन्सरमध्ये फटाक्यांसारखा आवाज वाजवून दहशत निर्माण करणार्‍याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करीत त्यांच्याकडील चार अलिशान दुचाकी जप्त केल्या आहेत.

गांजा ओढणााऱ्या दोघांकडून तरुणाला मारहाण – सविस्तर बातमी

आशिष अशोक शिंदे (वय २१ रा लेन नं ९, निंबाळकरनगर, लोहगाव) गुरुपितसिंग कर्नलसिंग कंबोज (वय २१ रा. लेन नं. ९, निंबाळकरनगर, लोहगाव) संजय मुकेश सरवदे (वय २० रा. भिमनगर विश्रांतवाडी ) गौरव लक्ष्मण मस्के (वय २० रा.मस्केवस्ती, विश्रांतवाडी) यांच्यासह एका अल्पवयीनाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील ५ लाख ७५ हजारांच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

धानोरीतील रिगालीया सोसायटीजवळ ३१ जुलैला मध्यरात्री दोनच्या सुमारास रस्त्यावर काही तरुणांनी बुलेट गाडयांसह दुचाकींच्या सायलेंन्सरचा फटाक्या सारख्या कर्णकर्कश आवाज काढत होते. धोकादायक पध्दतीने गाडया चालविलेच्या रिल्स सोशल मिडीयावर व्हायरल होत होत्या. त्यामुळे परिसरातील नागरीकांनी रात्री परिसरात भितीदायक वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त झाल्या. याप्रकरणी तपास पथकाने माहिती घेउन दोन बुलटे, एक केटीएमसह स्प्लेंडर अशी वाहने जप्त केली.

संबंधित वाहन चालकांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तसेच दुचाकींचे सायलेंन्सर बाजूला काढण्यात आले आहेत. याप्रकरणी बेशिस्त रायडरांच्या कुटूंबियाला माहिती देण्यात आली आहे. तसेच यापुढे अशाप्रकाराची बेफिकरी करणार नसल्याची हमी रायडरांनी दिली आहे. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त चिलूमुला रजनिकांत, एसीपी सुनिल जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, पोलीस निरीक्षक अमर कदम, एपीआय सुनिल उगले, बबन वणवे, कृष्णा माचरे, यशवंत किर्वे, संपत भोसले, विशाल गाडे, वामन सावंत, संजय बादरे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, किशोर भुसारे, होना साबळे, प्रमोद जाधव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×