Breking News
Pune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटी

गुरूवार पेठेत दोन ठिकाणी घरफोडी…

११ लाख ५० हजारांचा ऐवज चोरीला

marathinews24.com

पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करीत तब्बल ११ लाख ५१ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १३ ते २१ जूनला गुरूवार पेठेतील रोशनी हौसिंग सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी बिबवेवाडीत राहणार्‍या एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साडी वाटपाच्या नावाखाली ८२ हजारांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा  गुरूवार पेठेतील रोशनी हौसिंग सोसायटीत फ्लॅट असून, १३ ते २१ जूनला घर बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिन्यांचा ऐवज चोरून नेला. तसेच चोरट्यांनी तक्रारदार महिलेच्या घराजवळ राहणार्‍या महिलेच्या घरासह मिळून ११ लाख ५१ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करीत आहेत.

विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये घरफोडी
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ३१ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २० जूनला सकाळी दहाच्या सुमारास एकतानगरमधील तिरूपती कॅम्प सोसायटीमध्ये घडली आहे.

याप्रकरणी तरूणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गंपले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×