Breking News
इंदापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनचांडोली येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनभरदिवसा पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावलेजीवनसाथीवरून झाली ओळख, लग्नाच्या आमिषाने २५ लाखांचा गंडाविभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजनइमारतीच्या पेटिंगचे काम करताना पडला, तरुण पेंटर ठार झालाBike Accident : भरधाव दुचाकी घसरून तरूणाचा मृत्यू, सहकारी जखमीFraud Case Pune : शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक करणारा जेरबंदHadapsar Crime News : हडपसर गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी गजाआडमुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते महाआवास अभियान अंतर्गत पुरस्कारांचे वितरण

मांजरी बुद्रूक परिसरात घरफोडी, ५ लाखांचा ऐवज लंपास

एटीएम मशीन फोडण्याचाही प्रयत्न

Marathinews24.com

पुणे – बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ५ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १५ ते १७ एप्रिलला हडपसरमधील मांजरी बुद्रूक परिसरात घडली आहे. चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी वैशाली रमेश देवकुळे (वय ४०, रा. लटके वडापाव दुकानाजवळ, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 62 लाखाची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार देवकुळे यांचे घर १५ ते १७ एप्रिलला बंद होते. नेमकी संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा पाच लाखांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी देवकुळे बाहेरगावाहून माघारी आल्या असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार शिंगाडे तपास करत आहेत.

मांजरी भागातील एटीएमची तोडफोड; रोकड चोरण्याचा प्रयत्न

बँकेच्या एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना मांजरी भागातील बेल्हेकर वस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी हर्षद सुरेंद्र सुतार (वय ३७, रा. आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, मांजरीतील बेल्हेकर वस्तीसह संबंधित परिसरातील दोन एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top