Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

महंमदवाडी, कोंढवा, बिबवेवाडीत घरफोडी

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील महमंदवाडी, कोंढवा, बिबवेवाडी येथे चोरट्यांनी घरफोडी करून साडे पाच लाखांचा ऐवज चोरी करून नेला. याप्रकरणी तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्ज देण्याच्या आमिषाने तरुणाची १९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पहिल्या गुन्ह्यात महमंदवाडी येथील न्याती हायलॅन्ड या सी ९ बंगल्यातून चोरट्यांनी घराचे लॉक तोडून घरातील ३५ हजारांचे दागिने चोरी करून नेले. हा प्रकार १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान घडला. याबाबत डॉ. रॉय सेबस्टियन (५५) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसर्‍या घटनेत कोंढव्यातील व्हिआयआयटी कॉलेज जवळील श्रीकृंज सोसायटीतून चोरट्यांनी सदनिकेचा कडी कोयंडा तोडून घरातील ४ लाख ५० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून नेले. हा प्रकार १८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान घडला. याप्रकरणी आकाश प्रभाकर सुर्यवंशी (४६, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तिसर्‍या घटनेत घरातील कुटुंब चुलत्यांच्या घरी धार्मिक पुजेसाठी बाहेर गेले असताना चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा उचकटून ७० हजारांचे सोन्याचे दागिने चेारी करून नेले. हा प्रकार बिबवेवाडी परिसरातील स्मशानभूमी समोर असलेल्या पोकळे वस्ती येथे घडला.

मोबाईल चोरताना हटकल्याने गजाने मारहाण

कचरा उचलताना मोबाईल चोरी प्रयत्न करत असताना हटकल्याच्या कारणावयन एकाला लोखंडी गजाने मारहाण करून दुखापत करणार्‍या एकावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी अर्जुन जाधव (२५, वाबळे वसती, केसनंद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनोज बाळु वाघमारे (४४, रा. वाघमारे वस्ती, सिध्दार्थनगर, वाघोली) यांनी वाघोली पोलिस ठाणयात तक्रार दिली आहे. हा प्रकार १९ सप्टेंबर रोजी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला.

तरूणीचा नग्न व्हिडीओ व्हायरल करणार्‍यांवर गुन्हा

तरूणीचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणात दोघांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज शर्मा (रा. बिहार) आणि भवानीसिंग राजपुत (रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका २३ वर्षीय तरूणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हा प्रकार १८ सप्टेंबर रोजी घडला. तक्रारदार तरूणीचे नग्न अवस्थेतील व्हिडीओ आरोपी राजपुत याने राज शर्मा याच्या व्हॉट्सअ‍ॅपवार पाठविला. त्यानंतर शर्मा याने तोच व्हिडीओ तरूणीच्या नातेवाईकांना पाठविला. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×