Breking News
डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९४ लाखांची फसवणूकघर खरेदी करुन देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूकPune Crime : समलैंगिक पतीकडून महिलेचा छळअनुसूचित जातींचे उपवर्गीकरण जातीय जनगणनेनंतरच करावे‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभमहिलांची सुरक्षा, सन्मान, आणि स्वातंत्र्य ही सामुहिक जबाबदारी- विजया रहाटकरपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १ लाखाहून थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीतरूणाला शेअरमधील गुंतवणूक पडली ५३ लाखांनासराईत दोन किलोमीटर पळाला, बिल्डींगवरही लपला

Crime News : वडगाव बुद्रूकमध्ये घरफोडी, एक लाखांचा ऐवज चोरीला

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

वडगाव बुद्रूकमधील रेणूकानगरीतील सदगुरूकृपा इमारती मधील घटना 

marathinews24.com

पुणे – Crime News : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख १२ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २३ जूनला सकाळी साडेदहा ते सहा वाजेदरम्यान वडगाव बुद्रूकमधील रेणूकानगरीतील सदगुरूकृपा इमारतीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बतावणी करुन ज्येष्ठ महिलेचे दागिने लांबविले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कुटूंबियासह वडगाव बुद्रूकमधील रेणूकानगरीतील सदगुरूकृपा इमारतीत राहायला आहेत. २३ जूनला सकाळच्या सुमारास त्यांनी फ्लॅट बंद केला होता. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातून १ लाख १२ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. घरी आल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

बसप्रवासात महिलेचे मंगळसूत्र चोरीला

Crime News : पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेचे ३० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना २३ जूनला सकाळी अकराच्या सुमारास कात्रज चौक ते भारती विद्यापीठ रूग्णालय प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी पिसोळीत राहणार्‍या ५५ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पिसोळीत राहायला असून, कामानिमित्त २३ जूनला सकाळी अकराच्या सुमारास कात्रज चौक ते भारती विद्यापीठ रूग्णालय दरम्यान प्रवास करीत होती. बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या खिशातील ३० हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी पोलीस अमलदार बारवकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×