Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

उद्योजकता विकास केंद्रामार्फत क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न

उद्योजकता विकास केंद्रामार्फत क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न

एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा पुण्यात नुकतीच संपन्न

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, मुंबई व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लघु, मध्यम उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे, गतीने बदल स्वीकारणे आणि सतत सुधारणा करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा पुण्यात नुकतीच संपन्न झाली.

ब्राह्मण महासंघाच्या संघटनात्मक वाढीसाठी मेळावे, संमेलने आवश्यक : डॉ. गोविंद कुलकर्णी – सविस्तर बातमी  

कार्यशाळेला कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे कंपनी सचिव अक्षय पाठक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या उपसंचालक मंजुषा चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचे समन्वय विभाग प्रमुख प्रदीप इंगळे, नागपूर विभागाचे रितेश रंगारी, एच. आर. वाघमारे, बार्टीचे राज्य समन्वयक डी. यू. थावरे तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेत ३३५ उद्यमींनी सहभाग नोंदवला. तसेच १७८ उद्योग करु इच्छिणाऱ्या नवउद्योजकांनी विविध स्टॉलला भेटी दिल्या. कार्यशाळेत जेम पोर्टल, डिजिटल लोन, आर्थिक साक्षरता, महिला आणि अनुसूचित जाती-जमाती मधील उद्योजकांमध्ये जागृती निर्माण करुन क्षमतेत वाढ करणे, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाजारपेठ ब्रँडिंग व मार्केटिंग, नवीन बाजारपेठ शोधणे, वित्तपुरवठ्याच्या योजनेचा लाभ घेणे आदी विषयांवर विषय तज्ञांनी मार्गदर्शन केले, असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी डॉ. ए. एस. डबीर यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×