Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

गुलटेकडीत व्यापाऱ्याच्या कार्यालयातून रोकड चोरी

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – व्यापाऱ्याच्या कार्यालयाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी रोकड, चांदीची नाणी असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुलटेकडी भागातील घडली. याबाबत आशिष नंदकिशोर अग्रवाल (वय ४४, रा. हाईड पार्क सोसायटी, मार्केट यार्ड) यांंनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपचा प्रारंभ – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रवाल यांचे गुलटेकडी भागातील सुयोग सेंटर संकुलात कार्यालय आहे. गुरुवारी (१८ सप्टेंबर) त्यांनी सायंकाळी सातच्या सुमारास कार्यालय बंद केले. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कार्यालय उघडण्यासाठी आले. त्यावेळी कार्यालयाचे कुलूप तोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी कार्यालयातील कपाटातून रोकड आणि चांदीची नाणी असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लांबविला. कार्यालयातून रोकड आणि चांदीची नाणी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर अग्रवाल यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यंचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×