नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीत १ ऑगस्ट सकाळी ७ वाजल्यापासून बदल
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध ठिकाणची स्थानिक मंडळे व राजकीय पक्ष कार्यकर्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठी यांच्या निमित्ताने १ ऑगस्ट रोजी सारस बागेतील लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा येथे मिरवणुक घेऊन येतात. पुष्पहार अर्पण करत असतात. त्यामुळे जेधे चौक ते सारसबाग येथे होणार्या गर्दीच्या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीत १ ऑगस्ट सकाळी ७ वाजल्यापासून बदल वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती वाहतुक विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
– जेधे चौकातून सारसबागेकउे जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यासाठी सिंहगड रोडला जाण्यासाठी जधे चौकाकडून सातारा रोडने सरळ व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक मार्गे सिंहगउरोडला जावे, सिंहगड रोडकडून स्वारगेटकडे जाण्यासाठी दांडेकर पुल- नाथ पै चौक- ना. सी.फडके चौक- पुरम चौक- टिळक रोडने- जेधे चौक या मार्गाचा वापर करावा.
– जेधे चौकातील वाय जंक्शन वरून सारसबागेकडे जाणार्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. त्या ऐवजी कात्रजकडून सारसबागेकडे जाणार्या वाहनचालकांनी ब्रीजवरून न जाता लक्ष्मीनारायण चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.
– वेगा सेंटर ते सारसबागे पर्यंत ग्रेडसेपरेटर मधून वाहनांना जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्या ऐवजी वेगा सेंटर पासून घोरपटी पेठ उद्यान, राष्ट्रभुषण चौक पासून हिराबाग चौकाकडून इच्छित स्थळी जावे.
– सावरकर चौकापासून पुढे पुरम चौकापर्यंत जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्या ऐवजी सावरकर चौक-दांडेकर पुल- नाथ पै चौक- ना. सी. फडके चौक- कल्पना हॉटेल कडुन डावीकडे टिळक रोड मार्गे इच्छित स्थळी जावे.
– दांडेकर पुल/सिंहगडरोड जंक्शन येथुन सावरकर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्या ऐवजी सावर चौक- दांडेकर पुल- नाथ पै चौक, ना. सी. फडके चौक- कल्पना हॉटेल कडुन डावीकडे टिळक रोड- पुरम चौक इच्छित स्थळी जावे.
– पुरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी वाहतुक शिथिलता देऊन दुहेरी करण्यात आली आहे.
– दांडेकर पुल व सावरकर चौक येथील वाहतुक आवश्यकतेनुसार दुपारी तीन ते १२ वाजेपर्यंत शिथिलता देवुन दुहेरी प्रवेश देण्यात येणार आहे.
– निलायम ब्रिजकडे सावरकर चौकाकडे येणारी वाहतुक आवश्यकतेनुसार निलायम ब्रिज वरून पर्वती गाव मार्ग वळविण्यात येणार आहे.
– शिवाजी रोडवरील वाहतुक आवश्यतेनुसार वळविण्यात येणार आहे. सेव्हन लव्हज चौकातुन जेधे चौकाकडे जाणारी वाहतुक आवश्यकतेनुसार वळविण्यसात येणार आहे. तर सातारा रोडकडून मित्रमंडळ चौक मार्गे सावरकर चौकाकडे येणार्यांनी दुचाकी वाहने पाटील प्लाझा येथे पार्क करावे असे अवाहन वाहतुकत विभागाचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.