नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – गोदामातून तब्बल २० लाख रूपयांचे केमिकल चोरून नेल्याची घटना १५ ते १६ जूनला धायरीतील रिलायबल केमिकल कंपनीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तीन ते चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाणेरमध्ये फ्लॅटमधून ५ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धायरीतील गोदामात कामाला असून, त्याठिकाणी विविध प्रकारचे केमिकल ठेवले जाते. १५ ते १६ जूनला चोरट्यांनी गोदामात शिरून २० लाख रूपयांचे तब्बल २००कॅन केमिकल चोरून नेले. याप्रकरणाची माहिती होताच कंपनीने तत्काळ नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा माग काढण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तपास करीत आहेत.
मोलकरणीचा ६ लाखांच्या बांगड्यावर डल्ला
घरकाम करणार्या मोलकरणीने ६ लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना २१ मे ते १५ जून कालावधीत विमाननगरमध्ये घडली होती. याप्रकरणी अनिता सुतार (वय ४५, रा. सोलापूर ) हिला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी ५९ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची आई विमाननगरमधील कोनार्क कॅम्पसमध्ये राहायला आहे. त्यांच्याकडे अनिता सुतार घरकाम करीत होती. त्यावेळी तिने तक्रारदार महिलेच्या आईच्या हातातील ६ लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. दरम्यान याप्रकरणाची माहिती मिळताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मोलकरणीला अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अशोक शिरसाठ तपास करीत आहेत.
























