Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान जुन्नर तालुक्यात संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान जुन्नर तालुक्यात संपन्न

दीड हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

marathinews24.com

पुणे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर श्री विघ्नहर सास्कृतिक भवन ओझर येथे आयोजित करण्यात आले. या शिबाराचे उद्घाटन आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात एकूण २२ स्टॉलच्या माध्यमातून १ हजार ६४१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी 

यावेळी जुन्नर-आंबेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार रणजीत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी
धनंजय पाटील, तालुक्यातील शासकीय विभागातील कार्यालय प्रमुख व पंचायत समिती सभापती / उपसभापती व जिल्हा व पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते.

तहसील कार्यालयातील संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग, सेतू कार्यालय व महसूल विभाग उपस्थित होता. तसेच तालुक्यातील सर्व गावांचे ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय महावितरण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगांव, नगर परिषद विभाग, सहाय्यक निबंध कार्यालय जुन्नर, भूमी अभिलेख कार्यालय, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस जुन्नर, पोलीस विभाग, एस टी महामंडळ व इतर उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. यामध्ये वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग योजना, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, आधार लिंक आदी विविध सेवांचा समावेश होता. नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली, नागरिकांनी शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×