Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. दुधभाते यांच्या ‘नेत्रकोष’चे प्रकाशन

मुंबईत ‘नेत्रकोष’ पुस्तकाचे प्रकाशन; डोळ्यांच्या आरोग्यावर सोप्या भाषेत मार्गदर्शन

marathinews24.com

मुंबई – पुण्यातील प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. अनिल दुधभाते लिखित ‘नेत्रकोष’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रसन्न वातावरणात पार पडले. साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचे अवलोकन करताना मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार – सविस्तर बातमी

या पुस्तकाला ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने तसेच प्रसिद्ध ‘दीक्षित डाएट’ संकल्पनेचे जनक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची प्रस्तावना लाभली आहे.

‘नेत्रकोष’ या पुस्तकामध्ये डोळ्यांच्या विविध आजारांबाबत अत्यंत सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक आजाराचे कारण, तो टाळण्यासाठी घरच्या घरी करता येणाऱ्या उपाययोजना, तसेच आजार झाल्यास प्राथमिक पातळीवर कोणती काळजी घ्यावी आणि नेत्रतज्ञांचा सल्ला केव्हा घ्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

डॉ. दुधभाते यांच्या सुमारे १५ वर्षांच्या अनुभवावर आधारित हे पुस्तक असून, विविध आजारांमधून बरे झालेल्या रुग्णांचे अनुभव आणि अभिप्रायही त्यांच्या स्वतःच्या भाषेत यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

हे पुस्तक वाचक आणि रुग्णांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म Amazon वर उपलब्ध असून लवकरच विविध पुस्तक विक्री केंद्रांवरही उपलब्ध होणार आहे. तसेच सिंहगड रोड येथील डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरमध्येही हे पुस्तक मिळणार आहे.

या प्रकाशन सोहळ्यास आमदार अभिमन्यू पवार, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सौ. डिंपल दुधभाते, साहित्यिक गिरीश वसेकर, डॉ. स्नेहल मानपुत्र, तन्मय कारंजकर, कृष्णा सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×