१५ लाख विध्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज, ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता बारावीचा (एचएससी) निकाल जाहीर करणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष या निकालाकडे लागलेले आहे.राज्य मंडळाने यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली. सुमारे १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in तसेच इतर वेबसाईटवर विध्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी महत्त्वाची सूचना
विद्यार्थ्यांनी त्यांच्या बारावीच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून निकाल पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट
mahahsscboard.maharashtra.gov.in
results.targetpublications.org
विध्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने देखील पाहता येणार निकाल
विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने देखील निकाल पाहता येणार आहे. यासाठी एसएमएस सेवेचा वापर करावा लागेल वापरता येईल.
DigiLocker वरून पाहता येणार मार्कशीट
महाराष्ट्र बारावीचा अधिकृत मार्कशीट आणि निकाल DigiLocker अॅप आणि वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल. व स्क्रीनशॉट देखील घेता येईल.
बारावीचा निकाल पाहण्याची प्रक्रिया
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
‘महाराष्ट्र एचएससी निकाल २०२५’ या लिंकवर क्लिक करा.
आपला रोल नंबर व आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
आता पुढे निकाल पहा वर क्लिक करा.
निकाल स्क्रीनवर तुम्हला दिसेल, त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआउट देखील घेता येईल.