Breking News
वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटपसस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलनदिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाशमाहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूकपुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेतपुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खूनशहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूगुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पणआरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ निमित्त २६ जुलै रोजी पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत बदलपुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

ट्रेकिंगदरम्यान निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सिंहगड किल्ल्यावर ट्रेक करताना घडली घटना

marathinews24.com

पुणे – ट्रेकिंगदरम्यान निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना शनिवारी (दि. १७ ) सकाळी सिंहगड किल्ल्यावर घडली आहे. निवृत्त सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) राजकुमार गायकवाड (वय ६२) यांचे ट्रेकिंगदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते मार्केटयार्ड परिसरात कुटुंबासोबत राहत होते. शनिवारी सकाळी ते काही मित्रांसोबत सिंहगड किल्ल्याच्या आतकरवाडी मार्गाने चढाई करत होते. ट्रेकदरम्यान अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांनी सोबत असलेल्या मित्रांना माहिती दिली, मात्र काही क्षणांतच त्यांची प्रकृती बिघडल्याने ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले.

कुख्यात गुंड गजा मारणेच्या साथीदारांच्या ४ मोटारी जप्त – सविस्तर बातमी 

परिसरात असलेल्या डॉक्टरने त्यांना त्वरित सीपीआर देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. घटनेची माहिती वन विभागाचे कर्मचारी समाधान पाटील यांनी तात्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला दिली. त्यानुर बचाव पथकाचे तानाजी भोसले आणि गणेश सपकाळ अवघ्या सहा ते सात मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या सोबत वन विभागाचे सुरक्षा रक्षक नितीन गोळे आणि संतोष पडेरे यांनीही मदत केली. गायकवाड यांना गंभीर अवस्थेत स्ट्रेचरवरून रेस्क्यू व्हॅनद्वारे खाली आणले. त्यानंतर तात्काळ मोरया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर सिंहगड किल्ल्याच्या ट्रेकिंग क्षेत्रात शोककळा पसरली असून, पोलिस विभागातही गायकवाड यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×