Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १ लाखाहून थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला वेग; १.०८ लाख थकीत कर्जदारांची माहिती पोर्टलवर अपलोड

marathinews24.com

पुणे – राज्यशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’-२०२६ च्या अंमलबजावणीअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केली ‘र्व्हच्यूअल रिॲलिटी रोड सेफ्टी टॅब लॅब’ची पाहणी – सविस्तर बातमी 

शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा उद्देशाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण कार्यालयाच्यावतीने या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्जदारांचा तपशील पोटर्लवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले असता बँकेच्यावतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोटर्लवर अपलोड केली आहे.

*अपलोड करण्यात आलेली तालुकानिहाय कर्जदार खातेदार संख्या:*
बँकेकडून कर्ज तपशील अपलोड केलेल्या खातेदारांची संख्या आंबेगाव तालुक्यात ३ हजार ३९०, बारामती १३ हजार ७२८, भोर ७ हजार २४२, दौंड १९ हजार ५६२, हवेली ४ हजार १६८, इंदापूर १८ हजार ८१८, जुन्नर ७ हजार ७७८, खेड ७ हजार ८५३, मावळ ५ हजार १७२, मुळशी २ हजार ३८७, पुरंदर ७ हजार ९०३, शिरुर ८ हजार ४५२ आणि वेल्हा १ हजार ८८८ थकीत कर्ज खातेदार याप्रमाणे आहे.

जिल्ह्यातील ११३ शेतकरी पात्र असूनही मयत असल्याने व अशा शेतकऱ्यांची वारस नोंद न झाल्याने अशा खात्याची माहिती अपलोड करता आलेली नाही. तसेच २९ सभासद लाभ घेण्यास पात्र असूनही त्यांचे आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने यांची माहिती पोर्टलवर अपलोड करता आलेली नाही. त्यामुळे मयत सभासदांच्या वारसांनी वारस नोंद तात्काळ करुन घ्यावी व आधार क्रमांक नसलेल्या सभासदांनी आधार क्रमांक उपलब्ध करून घ्यावा, जेणे करून त्यांची महिती पोर्टलवर अपलोड करता येईल, असेही आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×