Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादापुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रियापुणे-पिंपरीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडेदहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदलपुण्यात पानटपरी चालकाकडून ३०० रुपये हप्ता; खराडीतील पोलिस निलंबित

पुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेत

पुणे- पिंपरीतील दारूकांडातील मुख्य आरोपी जेरबंद

लोहियानगरमध्ये अल्पवयीनावर गोळीबार; गुंडासह तीन अल्पवयीन साथीदार ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील लोहियानगर भागात अल्पवयीनावर गोळीबार करणाऱ्या गुंडाला खडक पोलिसांनी अटक केली. आरोपीबरोबर असलेल्या तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहेत.अभिषेक उर्फ बाप्पा अपूर्गा कसबे (वय ३१, रा. पीएमसी काॅलनी, घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कसबे याच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका अल्पवयीनाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कसबे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कसबे याचा तक्रारदार अल्पवयीनाशी वाद झाला होता. लोहियानगरमधील बाबू मामडी चौकात अल्पवयीन शुक्रवारी (२४ जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास थांबला होता. त्या वेळी आरोपी कसबे आणि अल्पवयीन साथीदार तेथे आले. ‘माझ्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घे. माझ्या वडिलांनी तुला जीवे मारुन टाकायला सांगितले आहे’, अशी धमकी देऊन आरोपीने अल्पवयीनावर पिस्तूल राेखले. अल्पवयीनाच्या दिशेने आरोपीने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर आरोपीने परिसरात दहशत माजविली. पसार झालेल्या कसबे याच्यासह साथीदारांना रात्री उशीरा ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक अमोल वळसंग तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×