Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटप

वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटप

व्यसनमुक्तीचा संदेशही दिला 

marathinews24.com

छ. संभाजीनगर –  वैकुंठवासी हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप, हनवतखेडा यांच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून घाटी रुग्णालय तसेच अनाथ आश्रम येथे फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक, गरजू नागरिक तसेच अनाथ आश्रमातील मुलांना फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. यासोबतच उपस्थितांना निर्व्यसनी ग्रुपच्या कार्याची माहिती देत व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला.

सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलन – सविस्तर बातमी 

अनाथ आश्रमात दररोज हनुमान चालीसा पठण करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. तसेच मुलांमध्ये चांगले संस्कार रुजावेत, व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सुसंस्कृत जीवन जगावे, यासाठी उपस्थितांना मार्गदर्शनही करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत सेवा, संस्कार आणि व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य वैकुंठवासी हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप, हनवतखेडा सातत्याने करत असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सखाराम महाराज तडस; समाजप्रबोधनाचा जाज्वल्य वारसा

सखाराम महाराज तडस हे एक समाजसुधारक, वारकरी परंपरेचे खंदे प्रचारक आणि जनतेत देवत्व जागवणारे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आयुष्यभर समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, विषमता यांच्याविरुद्ध झुंज दिली आणि शिक्षण, स्वच्छता, भक्ती आणि सेवाभाव यांचा प्रसार केला. त्यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी आजही समाजहितासाठी विविध ठिकाणी उपक्रम राबविले जातात. हे त्यांच्या कार्याची आजही समाजात असलेली प्रभावी छाप अधोरेखित करते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×