Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक

नोकरीच्या बनावट ऑफरने तरुणाला १ लाख २२ हजारांचा गंडा

marathinews24.com

पुणे – माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने एकाची एक लाख २२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजे माळवाडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. पुण्यातील नामवंत माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीची संधी, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर त्यांनी चोरट्यांशी संपर्क साधला. नोकरीसाठी सुरुवातीला काही रक्कम जमा करावी लागेल, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक लाख २२ हजार रुपये त्यांनी वेळोवेळी जमा केले. नोकरीबाबत विचारणा त्यांनी केली. तेव्हा आरोपींचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान तपास करत आहेत.

परदेशी चलनाच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक

परदेशी चलन देण्याच्या आमिषाने एका तरुणाची १४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींशी तरुणाची ओळख झाली होती. परदेशी चलन (अमेरिकन डाॅलर) स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्याला जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणाकडून आरोपींनी वेळोवेळी १४ लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×