Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोेलनामुळे वाहतूक कोंडी

दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; पर्यायी मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

marathinews24.com

पुणे – काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शहराच्या मध्य भागात वाहतूक कोंडी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. आंदोलन संपल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ काॅक्रोच जनता पार्टीकडून शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा प्रारंभ कसबा पेठेतील जिजामात चौकातून करण्यात आला. फडके हौद चौक, दारुवाला पूल, नरपतगिरी चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास पोहोचला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ – सविस्तर बातमी

माेर्चाची सुरुवात झाल्यानंतर कसबा पेठेतून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले. जिजामाता चौक, गणेश रस्ता, दारुवाला पूल, अपोलो चित्रपटगृह रस्ता, नरपतगिरी चौक हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याने कुंभारवेस चौक ते मंगळवार पेठेतीलशाहीर अमर शेख चौक, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल चौक (मालधक्का चौक), जिल्हाधिकारी कार्यालय चौक परिसरात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक पर्यायी मार्गाने पुणे स्टेशनकडे पोहोचण्याच्या प्रयत्नात होते. कागदीपूरा, कुंभारवेस चौक, शाहीर अमरशेख चौक परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सोमवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ परिसरातील छोट्या रस्त्यावर कोंडी झाली होती. वाहतूक नियोजनासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. नरपतगिरी चौकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला होता. आंदोलन संपल्यानंतर सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×