Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादापुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रियापुणे-पिंपरीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडेदहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदलपुण्यात पानटपरी चालकाकडून ३०० रुपये हप्ता; खराडीतील पोलिस निलंबित

शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यू

पुणे-सोलापूर रस्त्यावर टेम्पोची ट्रकला धडक; उंड्रीत डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे-सोलापूर रस्ता, तसेच उंड्री परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी परिसरात ट्रकवर आदळून टेम्पो चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नल्लाबेल्ली नागेश्वरराव (वय ५०, रा. पुडी, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) असे मृत्यमुुखी पडलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत ट्रक चालक मोहम्मद हनीफ ख्वाजामियाँ शेख (वय ३८, रा. बार्शी, जि. सोलापूर) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२४ जुलै) पहाटे चारच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरून भरधाव टेम्पो निघाला होता. लोणी काळभोर भागातील कुंजीरवाडी परिसरात भरधाव टेम्पो पाठीमागून ट्रकवर आदळला. ट्रकवर टेम्पो आदळल्यानंतर पाठीमागून येणारी जीप ट्रकवर आदळली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नल्लाबेल्ली याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करत आहेत.

कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर उंड्री परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (२४ जुलै) सकाळी नऊच्या सुमारास घडली. रुपेश दिलीप बनसोडे (वय ३१, रा. वारजे माळवाडी) असे मृत्यमुुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी डंपर चालक साईराज संभाजी शितोळे (वय २५, रा. भूमकर चौक, वाकड) याला अटक करण्यात आली. याबाबत बनसोडे याचा भाऊ योगेश (वय ३३) याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×