Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

गुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पण

हडपसरमधील घरफोडीचा पोलिसांनी लावला छडा

आर्थिक गुन्हे शाखेकडून मुंबई विमानतळावर आरोपी अटकेत

marathinews24.com

पुणे – गुंतवणुकदारांची ८८ कोटी रुपयांची फसवणूक करुन परदेशात पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पण करण्यात आले. मुंबई विमानतळावर आरोपी उतरल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली. अविनाश अर्जुन राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार – सविस्तर बातमी 

बाणेर परिसरात अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा यांनी एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी ही कंपनी सुरू केली होती. राठोड दाम्पत्याने गुंतवणुकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखविले होते. राठोड दाम्पत्याने सुरुवातीला गुंतवणूकादरांना परतावा दिला. त्यानंतर त्यांनी परतावा देण्याचे थांबविले. परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात २० एप्रिल २०२३ रोजी तक्रार दिली. या तक्रारीवरुन राठोड दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर अविनाश आणि त्याची पत्नी विशाखा हे पसार झाले.

राठोड दाम्पत्य पसार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आर्थिक गु्न्हे शाखेने न्यायालयात दोघांना फरार घोषित करण्याचे प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. राठोड दाम्पत्य परदेशात पसार होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी रेड काॅर्नर नोटीस बजाविली. विशेष न्यायालयात राठोड दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त तेजस्वी सातपुते, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांंच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरू केली. राठोड हा परदेशात पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली. तो सध्या दुबईत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला देशात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले. राठोड याचे प्रत्यार्पण करण्यात आले. मुंबई विमानतळावर तो उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

वानवडीत पादचारी महिलांचे दागिने हिसकावले

पादचारी महिलांकडील ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना वानवडीतील एबीसी फार्म रस्त्यावर घडली.
या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि त्यांची मैत्रीण शुक्रवारी (२४ जुलै) रात्री आठच्या सुमारास वानवडीतील एबीसी फार्म रस्त्याने निघाली होती. त्या वेळी ऑक्सफोर्ड सोसायटीसमोर महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी, तसेच मैत्रिणीच्या गळ्यातील मंगळसूत्र असा ७५ हजार रुपयांचा ऐवज दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक सारिका शिर्के तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×