Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

दिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाश

दिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाश

दिवसा रेकी, रात्री घरफोडी; बीडमध्ये कुख्यात टोळीचा पर्दाफाश, मुख्य आरोपी अटकेत

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी घरे फोडणाऱ्या कुख्यात टोळीचा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. कारवाईत कृष्णा शेषराव राठोड (वय २५, रा. अंबुनाईक तांडा, ता. गेवराई) या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे ५ लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक ११ जुलैला रात्रीच्या वेळी फिर्यादी जेवण करून झोपलेले असताना अज्ञात चोरांनी लोखंडी कपाट उघडून सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी 

गावातील इतर महिलांच्या अंगावरील दागिनेही चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. या घटनेचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कृष्णा राठोड याला सासरवाडीला म्हणजे नाळवंडी तांडा येथे आल्याची माहिती मिळताच सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने आपल्या इतर पाच साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून, इतर साथीदार सध्या फरार आहेत. त्याच्याकडून पिंपळनेर आणि वडवणी येथील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जवळपास तीन तोळे सोने व दहा भार चांदी असा ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त केलेला ऐवज पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे जमा करण्यात आला आहे. हा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार शरद पवार करत आहेत. ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख, डीवायएसपी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक शेखर औटे, महेश विघ्ने, हवालदार विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, गोवींद राख, अंमलदार बबन सलगर, आशापाक सय्यद, तसेच चालक सिध्देश्वर मांजरे, दिलीप गिते आणि सुनिल राठोड यांच्या पथकाने पार पाडली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×