Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात कोम्बिंग ऑपरेशनचा तडाखा, ६ बांग्लादेशी महिला ताब्यात

पुण्यात कोम्बिंग ऑपरेशनचा तडाखा, ६ बांग्लादेशी महिला ताब्यात

पोलीस उपायुक्तांकडून कारवाईचे शतक

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून बेकायदेशीर राहणार्‍या ६ बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरूद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पदभार स्वीकारल्यापासून पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी तब्बल १०३ बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेउन कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील काही वर्षांतील ही सर्वात मोठी कामगिरी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तोपर्यंत आम्ही तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही – सविस्तर बातमी

कल्पना कमल शेख (वय ३८) राणी रफिक शेख (वय ४२) लकी हालेंग मंडल (वय ४०) पूजा रफिक शेख (वय २०) रुमा जानी शेख (वय ३०) निशी शहाजहान धाली (वय २९ सर्व रा. बांग्लादेश) अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत.

बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी नागरिकांविरूद्ध पुणे पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांग्लादेशी नागरिकांची सर्च मोहिम राबवली जात आहे. प्रामुख्याने मध्यवर्ती फरासखाना, विश्रामबाग, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईला गती दिली आहे. दरम्यान, २४ मे रोजी फरासखाना, खडक पोलिसांनी हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सागर इमारतीत छापा टाकला. त्यावेळी हिंदुस्थानात विना परवाना बेकायदेशीरित्या राहणार्‍या ६ महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरूद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्युटी पार्लर, शिवणकामासाठी बांग्लादेशातून आणले पुण्यात

संबंधित महिलांनी सुरुवातीला ब्युटी पार्लर, शिवणकाम किंवा घरगुती कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना हिंदुस्थानात आणण्यात आले. मात्र, त्यांना अशाप्रकारे कोणतेही काम मिळवून न देता थेट बुधवार पेठेत वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. संबंधित महिलांनी स्वेच्छेने वेश्याव्यवसाय सुरू केली आहे. बांग्लादेशी महिलांना हिंदुस्थानात कोणी आणले, सीमा कशी ओलांडली, प्रवेशासाठी कागदपत्रे कशी मिळवली, याचा तपास सुरू आहे.

पोलीस उपायुक्तांकडून कारवाईचे शतक

बांग्लादेशी महिलांविरूद्ध कारवाईसाठी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी विशेष प्राधान्य दिले होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवाईने शंभरी पार केली आहे. आतापर्यंत १०३ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले. त्यापैकी अनेकांना देशाबाहेर पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.

शहरात बेकायदेशीपणे राहणार्‍या बांग्लादेशींविरूद्ध वारंवार कारवाई केली जात आहे. सर्च मोहिम, कोम्बिंग ऑपरेशन, खबर्‍यांच्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी छापेमारी करून बांग्लादेशींना ताब्यात घेतले जात आहे.

कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×