Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

संगणक अभियंता दाम्पत्याची सव्वा कोटीची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, तसेच शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी संगणक अभियंता दाम्पत्याची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४० वर्षीय महिलेने शिवाजीनगरमधील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यकृताचा भाग देऊन भावाने दिले २२ वर्षीय करणला जीवदान – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिचे पती संगणक अभियंता आहेत. दाम्पत्य मगरपट्टा सिटीत राहायला आहे. जुलै महिन्यात सायबर चोरट्यांनी तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. सोशल मीडियावरील समूहात महिलेला परस्पर सहभागी करून घेण्यात आले. चोरट्यांनी घरातून कामाची संधी (ऑनलाइन टास्क), तसेच शेअर बाजारातील गुंतवणूक योजनांची त्यांना माहिती देण्यात आली.

सायबर चोरट्यांनी त्यांना गुंतवणुकीवर चांगला परसंगणक अभियंता दाम्पत्याची सव्वा कोटीची फसवणूकतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. २३ ते ३१ जुलै या कालावधीत त्यांनी सायबर चोरट्यांच्या खात्यात एक काेटी २७ लाख ७० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्यांनी परताव्याबाबत विचारणा केली. चोरट्यांनी परतावा न देता त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास आहेत.

शेअर बाजार, तसेच ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहे. सायबर चोरट्यांनी पुणे शहरातील अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षितांचे प्रमाण जास्त आहे. सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र, पोलिसांच्या आवाहनाकडे कानाडोळा करून अनेक जण सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडल्याचे दिसून आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×