Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

महावितरणच्या रोहित्राची तोडफाेड करुन तांब्याची तार चोरीला

Sahakarnagar gang terror

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन चोरट्यांनी ८०किलाे तांब्याची तार चोरून नेल्याची घटना लोणीकंद-थेऊर रस्त्यावर घडली. आठवडभरात लोणीकंद, वाघोली भागात महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरून नेण्याची तीन घटना घडल्या आहेत.

‘रिवार्ड पाॅईंटच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी

या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणचे कर्मचारी पुरुषोत्तम बेलदार (वय ४३, रा. लोणीकंद, पुणे -अहिल्यानगर रस्ता) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद-थेऊर रस्ता परिसरात महावितरणचे रोहित्र आहे. चोरट्यांनी ४ जून रोजी रोहित्राची तोडफोड करुन ९० किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्या. या भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर रहिवाशांनी महावितरणकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार भुरे तपास करत आहेत. चार दिवसांपूर्वी मांजरी आणि लोणीकंद भागात महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन ९०० किलो वजनाची तांब्याची तार चोरून नेली होती.

विवाहाच्या आमिषाने १६ लाखांची फसवणूक

समाजमाध्यमात झालेली ओळख एकाला महागात पडली. विवाहाच्या आमिषाने महिलेसह तिच्या साथीदारांनी एकाची १६ लाखांची फसवणूक केली. माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह, बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४१ वर्षीय तक्रारदार सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत. त्यांची समाजमाध्यमातून एका महिलेशी ओळख झाली होती. महिलेने त्यांना जाळ्यात ओढले. परदेशी चलन व्यवहारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेने तक्रारदाराला एका बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. तक्रारदाराने बँक खात्यात १६ लाख ५४ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर तक्रारदाराला परतावा मिळाला नाही, तसेच मुळ मुद्दल परत करण्याबाबत महिलेशी संपर्क साधला. तेव्हा तिने टाळाटाळ सुरू केली. तिने मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×