Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

कुरिअर बॉयनेच लुटले ९० लाखांचे दागिने

मुंबईला पोहोचवण्याऐवजी वाकडच्या पुलाखाली उतरून पोबारा

marathinews24.com

पुणे – ग्राहकांचे ९० लाख ३३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने मुंबईला पोहोचवण्यासाठी घेऊन निघालेल्या कुरिअर बॉयनेच दागिने लंपास करून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जितेंद्र ऋषिकेश सिंह यांनी याबाबत खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल सत्यपाल चौहान (वय २०, रा. उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरून महिलेची ४९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह यांची घोरपडे पेठेतील राष्ट्रभूषण चौकात एस. जी. एल. जे. पी. लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कुरिअर कंपनी आहे. ग्राहकांचे पैसे, सोने-चांदीचे दागिने कुरिअरद्वारे पोहोचवण्याचे काम कंपनीकडून केले जाते. पुण्यासह सहा शहरांमध्ये कंपनीचे कामकाज आहे. चौहान हा कंपनीच्या मुंबई कार्यालयात कार्यरत होता.

५ ऑगस्ट रोजी विविध ग्राहकांचे ९० लाख ३३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने मुंबईला पोहोचवण्यासाठी चौहानकडे देण्यात आले होते. मात्र, मुंबई कार्यालयात दागिने जमा न करता तो पसार झाला. याप्रकरणी खडक पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईऐवजी वाकडला उतरला

फिर्यादी हे अनेक वर्षांपासून ग्राहकांचे सोने-चांदी कुरिअरद्वारे पोहोचवण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांची बस वाहकांशी ओळख आहे. चौहान मुंबई कार्यालयात पोहोचला नसल्याचे समजल्यानंतर फिर्यादी यांनी बस वाहकाशी संपर्क साधला. त्यावेळी चौहान मुंबईला न जाता वाकड येथील पुलाखाली उतरल्याचे वाहकाने सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×