Breking News
विद्यार्थिनींचा छळ म्हणजे संवेदनहिनतेचं भयंकर उदाहरण- डॉ. नीलम गोऱ्हेअण्णाभाऊ साठे साहित्यभूषण पुरस्काराने विक्रम शिंदे सन्मानितधर्मवीर गडावर संभाजी महाराजांची सृष्टी उभारावीआई-मुलाच्या नात्यावर फुंकर घालणारे ‘पेरले’ गीत रसिकांच्या भेटीलाCrime News : शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे आमिष पडले ४० लाखांनाPune – नवले पुलाजवळ अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशी ठारआई-बाबांवरील रागाने तिने गाव सोडले; पण पुणे पोलिसांमुळे आयुष्य वाचलेआर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार-उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे शहरातील गुन्हेगारीत प्रचंड वाढयूपीएससी-२०२४ यशस्वितांचा सत्कार सोहळा १२ जुलैला

Crime News : महाविद्यालयीन तरुणीला त्रास देणाऱ्या रोडरोमिओला बेड्या

महाविद्यालयीन तरुणीला त्रास देणाऱ्या रोडरोमिओला बेड्या

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे Crime News : महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास, तसेच विनयभंग करणाऱ्या रोड रोमिओला येरवडा पोलिसांनी अटक केली. साहिल याकुब सय्यद (वय २४, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत तरुणीच्या बहिणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी सय्यद हा जानेवारी महिन्यापासून तिचा पाठलाग करत होता. महाविद्यालयाच्या आवारात जाऊन त्याने तरुणीला धमकावून मोटारीस बसण्यास सांगितले. त्याने तिच्यासोबत छायाचित्र काढले, तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

सय्यदच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने घटनेची माहिती मोठ्या बहिणीला दिली. त्यानंतर बहिणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सय्यद याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक देवकर तपास करत आहेत. शाळकरी मुली, महाविद्यालयीन युवतींना त्रास दिल्यास त्यांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह भूकरमापकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे – जमिनीची मोजणी करत नसल्याने राष्ट्रीय अनुसुचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार केल्याच्या रागातून जमिनीची मोजणी करुन चुकीची ‘क’ प्रत तयार केल्याच्या आरोपावरुन भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षकसाह भूकरमापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी चुकीची ‘क’ प्रत तयार करुन एका सराफ व्यावसायिकाचे नुकसान केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उपअधीक्षक शिवप्रसाद गौरकर, भूकरमापक आकाश माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष जानकीराम राय (रा. सिल्वर इस्टेट, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राय यांना त्यांच्या जागेत बांधकाम करायचे होते. त्यासाठी त्यांनी भूमी अभिलेख हवेली कार्यालयाकडे मोजणीसाठी अर्ज केला होता. अनेकदा विनंती करुनही त्यांनी मोजणी न केल्याने राय यांनी दिल्लीतील राष्ट्रीय अनुसुचित जाती जमाती आयोगाकडे (नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट) तक्रार केली. या संस्थेने तक्रारीची दखल घेतली. तसेच जिल्हाधिकारी यांना मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचित केले होते. त्यानंतर भूकरमापक आकाश माने यांनी जागेवर येऊन मोजणी केली.

त्याची ‘क’ प्रत तयार केली. मात्र, राय यांच्या क्षेत्राचा सर्व्हे क्रमांक चुकीचा दाखवुन ‘क’ प्रत तयार केली. राय यांची जागा नकाशावर न दाखवता उपअधीक्षक शिवप्रसाद गौरकर यांनी ही कागदपत्रांची पडताळणी केली नाही. गैारकर यांनी ‘क’ प्रतीवर स्वाक्षरी केली.
राय यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. नकाशावर मालकिची जागा दिसत नसल्याने नुकसान झाल्याचे राय यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

नोकरीच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

Crime News : नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी सिंहगड रस्ता भागातील एकाची ११ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत.

नोकरीच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

२१ एप्रिल रोजी सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला ई- मेल पाठविला. एका बड्या कंपनीत नोकरीची संधी, असे आमिष चोरट्यांनी त्यांना ई-मेलद्वारे दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पैसे भरावे लागतील, असे सांगतिले. त्यानंतर चोरट्यांच्या बँक खात्यात सुरुवातीला तक्रारदाराने काही रकम पाठविली. चोरट्यांनी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदाराकडून गेल्या तीन महिन्यांत ११ लाख २५ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top