Breking News
धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचारपुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आगगर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावीवडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटकऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीराजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमाऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कारबंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसारपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नव्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास १८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास १८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अर्ज करण्यास मुदतवाढ, १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

marathinews24.com

पुणे – सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून संस्थांनी १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतात प्रथमच पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन – सविस्तर बातमी 

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सन २०२३-२४ चा पुरस्कार देवून त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. यासाठी यापूर्वी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास कळविण्यात आले होते. तथापि, सन २०२५ या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये अधिकाधिक सहकारी संस्थांना पुरस्कार मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करता यावेत यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक सहकारी संस्थांनी सविस्तर प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधक, सहकारी संस्था किंवा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात सादर करावेत.

सहकारी संस्थांनी पुरस्काराच्या अटी, निकष आदी अधिक माहितीसाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच तालुक्याचे सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक अथवा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे अपर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था, श्रीकृष्ण वाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×