Breking News
Pune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्या

१० लाखांच्या लाचेची मागणी; शिवाजीनगरच्या महिला तलाठीसह कोतवालावर गुन्हा

ट्रॅक्टर अनुदानासाठी लाचेची मागणी

परवानगीपेक्षा ३ हजार २०० ब्रास अधिक खोदकाम

marathinews24.com

पुणे – जमिनीच्या खोदकामाचा ‘निल’ पंचनामा करून तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड टाळून देण्याच्या मोबदल्यात १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील महिला तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकाटे (व्यब37) आणि कोतवाल महेश मधुकर मुंढे (वय 30) या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

‘मॅगनेट’ प्रकल्पाबाबत अफवांवर स्पष्टीकरण; शेतकऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे-प्रकल्प संचालक – सविस्तर बातमी

तक्रारदार हे खोदकाम कंत्राटदार असून, त्यांच्या कंपनीकडून सेनापती बापट रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ९६७ मधील व्यावसायिक प्रकल्पाच्या इमारतीच्या पायाचे खोदकाम सुरू होते. या कामाची पाहणी करताना तलाठी आश्विनी कोकाटे यांनी नियमानुसार परवानगीपेक्षा तब्बल ३ हजार २०० ब्रास अधिक खोदकाम झाल्याचा पंचनामा केला होता. या अतिरिक्त खोदकामामुळे तक्रारदारावर सुमारे दोन कोटी रुपयांचा दंड आकारला जाऊ शकत होता. हा दंड टाळण्यासाठी तहसीलदारांकडे ‘निल’ पंचनाम्याचा अहवाल सादर करून देण्याच्या बदल्यात आश्विनी कोकाटे यांनी तक्रारदाराकडे १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने १५ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर विभागाने पडताळणी केली असता, कोकाटे यांनी लाचेची रक्कम कोतवाल महेश मुंढे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. तसेच महेश मुंढे यानेही लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवून या व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. पडताळणीत लाच मागणीची खात्री झाल्यानंतर मंगळवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही कारवाई शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे, पोलिस शिपाई विकास आडके, वैशाली माकर आणि दिपक काकडे यांच्‍या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×