Breking News
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागतसैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यातलायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश खामगळ यांची निवड

औंध, बालेवाडी व खडकी परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

माजी नगरसेवक सनी निम्हण यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

marathinews24.com

पुणे – शहराच्या पश्चिम भागातील औंध, बालेवाडी व खडकी या रहिवासी आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरांमध्ये गेल्या काही दिवसांत भरदिवसा होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांच्या दागिन्यांची उघडपणे चोरी, घरे व व्यावसायिक स्थळांवर धाडसी चोऱ्या यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावत आहे. या घटनांना आळा घालावा आणि दोषींवर तत्काल कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनेंतर्गत प्रवासी कंपनी निवडीसाठी निविदा प्रसिद्ध – सविस्तर बातमी

या निवेदनात सनी निम्हण यांनी म्हटले आहे की,  चोरी आणि लुटीच्या घटनांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणेबाबतचा विश्वास डळमळीत होत चालला आहे. सार्वजनिक सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

या उपाययोजना करण्याची मागणी

१. संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त व बंदोबस्तात वाढ करावी, विशेषतः चोरी होणाऱ्या भागांमध्ये दिवसाच्या वेळेतही नियमित पोलीस गस्तीस प्राधान्य द्यावे.

२. सीसीटीव्ही यंत्रणेची स्थिती तपासून निकृष्ट वा बंद अवस्थेतील उपकरणे दुरुस्त अथवा बदलण्यात यावीत, सार्वजनिक ठिकाणांवरील देखरेखीच्या व्यवस्थेचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करावा.

३. स्थानीय रहिवाशांशी समन्वय साधण्यासाठी ‘मोहल्ला कमिटी’ व ‘बीट पोलिसिंग’ उपक्रम अधिक सक्रिय व प्रभावीपणे राबवावे, नागरिकांच्या सहभागातून स्थानिक पातळीवर गुन्हेगारी रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा.

४. चोरीच्या घटनांची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर व त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारे झालेल्या घटनांचे लवकरात लवकर उकल होणे आवश्यक आहे.

५. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी नियमित संवाद बैठकांचे आयोजन करावे, पोलिसांनी समुदायाशी थेट संवाद साधल्यास भीती दूर होऊन जनतेचा सहभाग वाढेल.

वरील गोष्टींची तात्काळ अंमलबजावणी केल्यास परिसरातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होईल आणि नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास पुनः दृढ होईल, अशी आम्हांस खात्री वाटते. आपल्याकडून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी अपेक्षा सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top