Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

खळदच्या महाआरोग्य शिबिरात अवयवदाते कुटुंबाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

अवयवदानातून मिळाले पाच जणांना जीवनदान; सुबनावळ कुटुंबीयांचा सन्मान

marathinews24.com

बारामती – पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खळद येथे आयोजित महाआरोग्य शिबिरात अवयवदाते सुबनावळ कुटुंबीयांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अश्वारूढ तिरंगा यात्रा संचलनातून क्रान्तिकारकांना अभिवादन – सविस्तर बातमी

मागील वर्षी इंदापूर तालुक्यातील कै. हिराबाई सुबनावळ यांचे ब्रेनडेड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पुत्र कैलास सुबनावळ यांनी अवयवदानासाठी सहमती दर्शविली. त्यांच्या या धाडसी आणि मानवतावादी निर्णयामुळे तब्बल पाच जणांना जीवनदान मिळाले.

यावेळी कैलास सुबनावळ यांनी, “जळून राख होण्यापेक्षा आईला अवयवदानरूपी जिवंत ठेवले,” अशी भावना व्यक्त केली. इंदापूर तालुक्यातील एका छोट्या गावातील कुटुंबाने घेतलेला हा सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी निर्णय समाजासाठी आदर्श ठरत आहे.

या शिबिरात तब्बल ८ हजार ८८० लाभार्थींनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला. शिबिरात तपासणीदरम्यान सुमारे २ हजार रुग्णांमध्ये विविध आजारांचे निदान झाले. या रुग्णांवर पुढील पंधरवड्यापासून महिनाभराच्या कालावधीत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचार उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत नियोजन करण्यात आले आहे.
या महाआरोग्य शिबिरात अवयवदानाबाबत जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी अवयवदानाचे महत्त्व, त्यातून मिळणारे जीवनदान आणि समाजातील गैरसमज दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे महादेव मगर (संपर्क ९८५०५१२२२३)
यांनी कळविली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×