Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून शहरातील वादळग्रस्त भागाची पाहणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून शहरातील वादळग्रस्त भागाची पाहणी

उन्मळून पडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणासह नवीन वृक्षारोपण उपक्रम राबवावा – उपमुख्यमंत्री; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायकल रॅलीचा शुभांरभ

marathinews24.com

बारामती – बारामती शहर आणि परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील उन्मळून पडलेल्या झाडांचे मुळासकट पुनर्रोपण करावे, पावसाळ्यापुर्वी नव्याने अधिकाधिक वृक्षारोपण करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. तत्पूर्वी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती सायकल क्लब आणि बारामती हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल रॅलीला श्रीमती पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

तरुणांमध्ये नेतृत्त्वक्षमता विकसित करण्यासाठी विद्यापीठे, उद्योगसंस्थांमध्ये भागीदारीची गरज-राज्यपाल जिष्णू देव वर्मा – सविस्तर बातमी

तिरंगा सर्कल ते पुनावाला गार्डन रेल्वे स्टेशन मार्ग दरम्यान आयोजित सायकल रॅलीचा शुभारंभ श्रीमती पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच त्यांनी शहरातील वादळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, बारामती ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी किशोर माने, न.प. मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक संभाजी होळकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती सायकल क्लब आणि बारामती हेल्थ क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाल्या, बारामती शहर आणि परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते, यावेळी नागरिकांच्या पुढाकाराने तसेच सर्व यंत्रणांनी अहोरात्र काम करुन जनजीवन पूर्ववत केले. या कालावधीत शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली, त्यांचे पुनर्रोपण करावे. येत्या पावसाळ्यात अधिक वेगाने वाऱ्याचे वहन झाल्यास झाडे वाचली पाहिजेत, याकरिता उपाययोजना कराव्यात.

निवडणूकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने विकास कामांना गती द्यावी, प्रलंबित प्रकल्प गतीने पूर्ण करावे, स्वर्गीय अजित पवार यांच्या स्वप्नातील बारामती तालुका विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वादळग्रस्त भागाची पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×