Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

कटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करा

कटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

marathinews24.com

पुणे – बारामती तालुक्यातील कटफळ येथे २० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहे. क्रीडा सुविधा विकसित करताना सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात यावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील, यादृष्टीनेही कामे करावीत, असे निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा – सविस्तर बातमी 

विधानभवन येथील झुंबर सभागृह येथे जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, क्रीडा संकुल समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, कै भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन करण्याबाबत प्रास्तावित करण्यात आले असून येत्याकाळात पर्जन्यमान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच पालखी सोहळ्याचा विचार करुन स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी.

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल पुणे (बारामती) देखभाल दुरुस्तीबाबत आराखडा तयार करुन सादर करावा. बैठकीत क्रीडा विषयाच्या अनुषंगाने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली, सकारात्मक चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. प्रतिभावंत खेळाडू घडविण्यावर क्रीडा विभागाने भर द्यावा, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

या बैठकीत श्री. लकडे यांनी क्रीडा संकुल देखभाल दुरुस्ती, नवीन क्रीडा साहित्य खरेदी, सार्वजनिक बांधकाम विभागाला लागणारा निधी वर्ग करणे आदी विषयांवर माहिती आली.

यावेळी श्रीमती पवार यांच्या हस्ते हिंद केसरी महेंद्र गायकवाड, जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नितीन पवळे, गोकर्ण शर्मा तसेच जागतिक ट्रेडीशनल ग्रुप व हँडसेट खेळात सुवर्णपदक विजेता निरल वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
0000

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×