Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण

पुणे जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षणाची ९३ टक्के प्रक्रिया पूर्ण

marathinews24.com

पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ९६ टक्के अर्जांचे वितरण पूर्ण झाले असून ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चा – सविस्तर बातमी

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या साप्ताहिक बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार शीतल मुळे यांच्यासह नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, सचिव तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.

अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांच्या याद्या संकेतस्थळावर

उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर म्हणाल्या, अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी या याद्यांचे अवलोकन करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच नमुना क्रमांक ६, ७ व ८ मधील अर्जांचे अवलोकन करून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी त्याचा उपयोग करावा.

मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य महत्त्वाचे असून प्राप्त होणारे दावे व हरकती विहित मुदतीत निकाली काढण्यासाठी प्राधान्याने नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणीसाठी सहकार्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर व शिक्षक मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या प्रक्रियेत शिक्षक व पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीमती कळसकर यांनी केले.

बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात अडचणी व सूचना मांडल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी संबंधित अडचणींचे निरसन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×