Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

दौंडमध्ये सेवा पंधरवड्यात ५०० हून लाभपत्राचे वितरण

दौंडमध्ये सेवा पंधरवड्यात ५०० हून लाभपत्राचे वितरण

१६ गावांच्या जीआयएस आधारित नकाशाचे अनावरण

marathinews24.com

पुणे – सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत दौंड तालुक्यात तालुक्याचे आमदार राहुल कूल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ५०० हून अधिक लाभपत्राचे श्रीकृष्ण मंगल कार्यालय, बोरीपार्धी, चौफुला येथे वितरण करण्यात आले. नागरिकांना सेवा पंधरवडा उपक्रमात सहभागी होऊन सेवांचा लाभ घेण्याचे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले. राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर)ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा दौंड येथे शुक्रवारी (दि.१९) शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

रंगमंच विटाळू नका; प्रसंगी नाटकाचा शस्त्रासारखा वापर करा- नाना पाटेकर – सविस्तर बातमी 

सेवा पंधरवड्यात देण्यात येणाऱ्या सेवा व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच तालुक्यात महसूल विभागामार्फत सर्व गावातील गाव रस्ते, शेत रस्ते, पाणंद रस्त्यांना सांकेतांक क्रमांक देऊन यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार प्राथमिक टप्प्यात एकूण १६ गावांच्या भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित नकाशाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी भटक्या व विमुक्त जाती यांचे जातीचे दाखले ५०, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजना लाभार्थी प्रमाणपत्रे १२५, भामा आसखेड व पुनर्वसन शेरे कमी दाखले १३४ गट , पुनर्वसन भूखंड वाटप २६, शिधापत्रिका वाटप ३२, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात मदत वितरण दाखले ४ या प्रमाणे लाभपत्राचे वितरण करण्यात आले, असे तहसीलदार अरूण शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकांनव्ये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×