Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादापुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रियापुणे-पिंपरीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडेदहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदलपुण्यात पानटपरी चालकाकडून ३०० रुपये हप्ता; खराडीतील पोलिस निलंबित

मतदारांनी बीएलओंशी संपर्क साधून एन्युमरेशन फॉर्म भरून द्यावेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

शनिवार-रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केंद्रांवर बीएलओ राहणार उपस्थित

marathinews24.com

पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात विशेष सघन पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचे पुनरिक्षण सुरू आहे. या प्रक्रियेत मतदारांना आवश्यक सहकार्य मिळावे आणि त्यांचे एन्युमरेशन फॉर्म वेळेत भरून घेता यावेत, यासाठी आगामी शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सर्व मतदान केंद्रांवर बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत.

‘ई-प्रमाण’मुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती आता घरबसल्या – सविस्तर बातमी

या कालावधीत एसआयआर प्रक्रियेतील मतदारांनी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर भेट देऊन तेथे उपस्थित असलेल्या बीएलओशी संपर्क साधावा. मतदारांनी आपला एन्युमरेशन फॉर्म भरून आवश्यक ती माहिती व कागदपत्रे सादर करावीत. बीएलओंकडून फॉर्म भरण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दरम्यान, मतदार यादीच्या पुनरिक्षण प्रक्रियेत अनुपस्थित (Absent/Shifted) आणि दुबार (Duplicate) मतदारांची यादी तयार करण्यात आली असून, संबंधित यादी निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी सर्व राजकीय पक्षांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही, याची खात्री करावी. यादीमध्ये आपल्या नावाबाबत काही आक्षेप, शंका किंवा दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित बीएलओशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करून घ्यावी.

विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेमध्ये प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूक आणि अद्ययावत राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्या मतदारांनी अद्याप एन्युमरेशन फॉर्म भरून दिलेला नाही, त्यांनी या शनिवार-रविवारच्या विशेष उपलब्धतेचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या कुटुंबातील पात्र मतदारांचेही फॉर्म भरून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या या प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. आपल्या नावाबाबत कोणतीही अडचण, शंका किंवा माहितीची आवश्यकता असल्यास संबंधित बीएलओशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×