Breking News
ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालन

सच्चा गांधीवादी, समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Dr Kumar Saptarshi, Sunetra Ajit Pawar

डॉ.कुमार सप्तर्षी यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली

marathinews24.com

मुंबई – ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते, लेखक आणि तरुण पिढीचे मार्गदर्शक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे सच्चा गांधीवादी व समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

इथेनॉलयुक्त ई-२० पेट्रोलबाबतच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’चे देशव्यापी ‘३एस’ आंदोलन – सविस्तर बातमी 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित, शोषित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि गांधीवादी विचारांच्या प्रसारासाठी समर्पित केले. युवक क्रांती दलाच्या (युक्रांद) माध्यमातून त्यांनी तरुणांमध्ये एक नवी ऊर्जा आणि सामाजिक जाणीव निर्माण केली. डॉ.सप्तर्षी हे अच्युतराव पटवर्धन एस.एम.जोशी, ना.ग.गोरे यांच्या समाजवादी परंपरेत वाढले. महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचे ते आयुष्यभर कट्टर अनुयायी राहिले. विविध आंदोलनांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागाने त्यांना ‘ सत्याग्रही ‘ म्हणून ओळख लाभली.

त्या पुढे म्हणाल्या की, डॉ. सप्तर्षी यांच्या लेखनाने आणि भाषणांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि साधेपणाने ते सर्वांचे आदर्श होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यातही ते कायम अग्रेसर असत. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सभागृहात उमटवलेली छाप आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. डॉ.सप्तर्षी यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×