Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वन

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थोपटे कुटुंबीयांची भेट घेत व्यक्त केल्या संवेदना

marathinews24.com

पुणे – राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनानंतर शिवसेना नेत्या व आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

भारतीय संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही प्रभावी – डॉ. गो. बं.  देगलूरकर – सविस्तर बातमी

डॉ. गोऱ्हे यांनी अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव व माजी आमदार तसेच अन्य कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला. यावेळी त्यांनी अनंतराव थोपटे यांच्या राजकीय, सामाजिक आणि जनसेवेतील योगदानाची आठवण करून दिली. त्यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील एक अभ्यासू व जनसामान्यांशी नाळ जुळलेला नेता हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी, रमेश कोंडे, बाळासाहेब चांदेरे, किरण साळी, निलेश घारे, अमोल पांगारे, गणेश निगडे, अजित ढोकळे उपस्थित होते. उपस्थितांनीही थोपटे यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

अनंतराव थोपटे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत ग्रामीण भागातील विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×