Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

भाविकांच्या सोयीसाठी एकविरा मंदिरासमोरील सभा मंडप उभारण्याचा डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संकल्प

भाविकांच्या सोयीसाठी एकविरा मंदिरासमोरील सभा मंडप उभारण्याचा डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संकल्प

एकविरा मातेच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन घेतले दर्शन 

marathinews24.com

लोणावळा – मावळ तालुक्यातील कार्ला परिसरातील प्राचीन आणि पवित्र असलेल्या एकविरा मातेच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांनी प्रसाद, साखर नैवेद्य आणि महावस्त्र अर्पण करून भाविकांसाठी सोयीसुविधा आणि सुरक्षिततेविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९ कोटी ७५ लाखांच्या निधीस मान्यता – सविस्तर बातमी 

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, वाहनतळाचा प्रश्न, खड्डेमय रस्ते आणि भाविकांच्या सोयीशी निगडित अनेक कामे अद्याप प्रलंबित आहेत. पीएमआरडीए आणि एमएमआरडीएने काही प्रमाणात लक्ष घातले असले तरी अधिक समन्वय साधून ही कामे वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे. दिवाळीनंतर विधानभवनात विशेष बैठक घेऊन संबंधित विभागांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात येणार असून अनेक वर्षे थांबलेली कामे गतीमान करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभा मंडप उभारण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या आमदार निधीतून १५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. पीडब्ल्यूडीकडून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ मिळताच या कामाला तातडीने सुरुवात होईल.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानातील तयारीचाही आढावा घेण्यात आला. पायरी मार्गावर रेलिंग बसविणे, मधमाशांच्या हल्ल्यापासून संरक्षण, लाकडी डोलीतून दर्शन घेणाऱ्या भक्तांची सुरक्षितता, आरोग्य सेवा सुविधा आणि पार्किंगच्या समस्येचे निराकरण यावर विशेष भर देण्यात आला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “भाविकांची सुरक्षितता आणि सोय ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. एकविरा मातेकडे प्रार्थना करते की, सर्व ग्रामस्थ व भक्तांना सुरक्षितता, सौख्य, लक्ष्मी आणि विजय लाभो.”

या प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत भगिनी जेहलम जोशी, शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख कांताताई पांढरे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, मावळ तालुकाप्रमुख राम सावंत, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, मावळ संघटक चंद्रकांत भोते तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन व सागर हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×