Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

हडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी परिसरात रविवारी घडली. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. गोविंद सुकाजी भालेराव (वय ७५, रा. बेंदवाडी, फुरसुंगी, हडपसर सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालक अण्णाप्पा सिद्धराम वाघमारे (रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत भालेराव यांचा नातू ओंकार (वय २६) याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद भालेराव हे रविवारी (९ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास फिरायला निघाले होते. फुरसुंगीतील बेंदवाडीतील कालव्याजवळ मोटारीने भालेराव यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भालेराव यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मोटार चालक वाघमारे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रोहित जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×