Breking News
वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटपसस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलनदिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाशमाहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूकपुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेतपुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खूनशहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूगुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पणआरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ निमित्त २६ जुलै रोजी पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत बदलपुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

marathinews24.com

पुणे – पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड, अवजड व मल्टी अॅक्सल वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

पुणे जिल्ह्यात अवैध दारूमाफियांवर धडक कारवाई – सविस्तर बातमी

या आदेशानुसार दि. १५ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दि. २४ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहरातून इतर शहरांकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही. संबंधित वाहनांसाठी सोलापूर, मुंबई, अहिल्यानगर, सासवड, चाकण, शिक्रापूर, तळेगाव, जेजुरी, सुपे आदी मार्गांद्वारे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

शहरात माल उतरविणे अथवा माल भरून इतरत्र जाणे आवश्यक असलेल्या तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांनी वाहतूक शाखा, पुणे शहर यांची ७२ तास अगोदर परवानगी घेऊन रात्री ११ ते सकाळी ६ वाजेदरम्यान निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, पेट्रोल, डिझेल, दूध, शेतीमाल आदी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे. नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×