दोन घटनेत ३१ लाखांचा गंडा
marathinews24.com
पुणे – शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याच्या बतावणीसह प्रीपेड टास्क पुर्ण करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ऑनलाईन फसवणूक केली. दोन वेगवेगळ्या घटनेत तब्बल ३१ लाखांचा गंडा घातला असून, याप्रकरणी सहकारनगर आणि चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
कुंजीरवाडीत घरफोडी, ८ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी
सायबर चोरट्यांनी एका जेष्ठासह त्यांच्या मुलीला शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो अशी बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादित केल्यानंतर व्हॉटसअॅप गु्रपमध्ये समाविष्ट करून घेतले. त्यानंतर त्यांना १९ लाख ५० हजार रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. परतावा न देता सायबर चोरट्यांनी त्यांची फसवणूक केली आहे. ही घटना ९ ते १५ सप्टेंबर कालावधीत धनकवडीत घडली आहे. याप्रकरणी जेष्ठाने सहकारनगर पोलसी ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करीत आहेत.
ऑनलाईनरित्या टास्क पुर्ण करण्याचे आमिष तरूणाला ११ लाख ५७ हजार रूपयांना पडले आहे. सायबर चोरट्यांनी संबंधित तरूणाला प्रीपेड टास्क पुर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार तरूणाने ११ लाख ५७ हजारांची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्यासोबतच संपर्क बंद करून फसवणूक केली आहे. ही घटना २५ एप्रिल ते १ मे कालावधीत खराडीत घडली असून, २४ वर्षीय तरूणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आणि बँकखाते धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत.
पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे दागिने चोरीला
पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील १ लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना १ सप्टेंबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट ते हडपसर प्रवासात घडली आहे. याप्रकरणी हडपसरमध्ये राहणार्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसरमध्ये राहायला असून, १ सप्टेंबरला दुपारी सव्वा दोनच्या सुमारास स्वारगेट ते हडपसर असा प्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील १ लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरी झाल्यानंतर महिलेने खडक पोलीस ठाण्यात धाव घेत नुकतीच तक्रार दाखल केली आहे. पोलीस अमलदार फरांदे तपास करीत आहेत





















