Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मतदार नोंदणी आदेशाचे पालन न करणे महागात

मतदार नोंदणी आदेशाचे पालन न करणे महागात

७ शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – मतदार नोंदणी मोहिमेत काम करण्याबाबत आदेशचा पालन न करणाऱ्या कर्वेनगर भागातील महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कोथरूड विधानसभा मतदार नोंदणी मोहिमेच्या पर्यवेक्षक मनीषा गुलाबाव मातारे (वय ३२) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कर्वेनगर येथील महापालिकेच्या शाळेतील पाच शिक्षक, तसेच एका खासगी मराठी शाळेतील दोन शिक्षक अशा सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलमांन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

गर्भलिंग निदानाविरोधात कठोर कारवाईची गरज; दोषसिद्धीसाठी पाठपुरावा करणार – डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा मातारे या राज्य कर विभागात निरीक्षक आहेत. कोथरूड मतदार संघातील मोहिमेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पर्यवेक्षक म्हणून त्या काम पाहत आहेत. मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल उदमले यांनी सात शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करण्याबाबत लेखी आदेश दिले होते. या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक तरडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×