Breking News
Pune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

जिल्ह्यातील १८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी

marathinews24.com

पुणे – राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण प्रकाश जगताप यांनी सर्व सहाय्यक निबंधकांना दिल्या आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ॲग्रीस्टॅक काढलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ॲग्रीस्टॅक काढून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्याकरिता राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन – सविस्तर बातमी

जिल्ह्यात अद्याप ८ हजार ७४९ शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. यामध्ये दौंड (११२६), इंदापूर (१२३२), भोर (१०३१), खेड (९३१), मावळ (७९५), शिरूर (६४५), जुन्नर (६४१), बारामती (६०८), हवेली (५९९), पुरंदर (५२४), आंबेगाव (२२९), वेल्हे (१७६), मुळशी (१३४) आणि पुणे (७८) याप्रमाणे आहे.

तसेच ॲग्रीस्टॅक असलेल्या मात्र अद्यापही आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ३८२ असून त्यामध्ये दौंड (१,५९७), इंदापूर (१,४६१), बारामती (९२२), भोर (९००), हवेली (८२१), पुरंदर (७५५), खेड (६४०), शिरूर (६१६), जुन्नर (४६४), मावळ (३७३), वेल्हे (३३८), पुणे (२९१), आंबेगाव (१३६) आणि मुळशी (६८) याप्रमाणे आहेत.

तरी सर्व सहाय्यक निबंधकांना त्यांच्या तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्यादृष्टीने शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. ही बाब शेतकरी कर्जमुक्तीशी संबंधित असल्याने कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावे, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×