Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

प्रदर्शन सहायक विलास कसबे यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार

प्रदर्शन सहायक विलास कसबे यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार

३१ वर्षे ६ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर विलास कसबे यांना भावपूर्ण निरोप

marathinews24.com

पुणे – विभागीय माहिती कार्यालयातील प्रदर्शन सहायक विलास कसबे हे ३१ वर्षे ६ महिन्याच्या दीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कसबे यांच्यामधील जनसंपर्काची, तत्परतेने काम करण्याची कला व नवनव्या गोष्टी शिकण्याचा गुण अन्य कर्मचाऱ्यांनी अंगिकारावा, असे आवाहन डॉ. मोघे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान थेऊर येथे संपन्न – सविस्तर बातमी 

विभागीय माहिती कार्यालयात कसबे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहायक संचालक सचिन गाढवे, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी तसेच सौ. लता कसबे, मुलगा जयेश, आदित्य, स्नुषा मृणालिनी उपस्थित होते.

डॉ. मोघे म्हणाले, कसबे यांनी त्यांच्या सेवा काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत जिव्हाळ्याचे, कौटुंबिक स्वरूपाचे नाते जपले. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील गाढा अनुभव होता. त्यांना सांगितलेले काम विश्वासाने पूर्ण होणार अशी खात्री होती. कार्यालयात नेहमी हसते- खेळते वातावरण ठेवले. त्यांनी नेहमीच अधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देण्याचा प्रशासकीय व्यवस्थेतील गुण टिकवून ठेवला. सेवानिवृत्तीनंतर पर्यटनाला प्राधान्य द्यावे. आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे सांगून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पाटील म्हणाले, कसबे यांचे काम माहिती व जनसंपर्क कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याने बोध घ्यावा असे होते. कसबे हे अत्यंत सुहृदय व्यक्तिमत्व आहे. मोठा जनसंपर्क असणाऱ्या व्यक्तींचे घराकडे थोडे दुर्लक्ष होते, त्यामुळे कसबे यांनी आता कुटुंबाला वेळ द्यावा. कसबे यांनी आपल्या कामाला पूर्णपणे न्याय दिला असे सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गाढवे, जयश्री रांगणेकर, ज्ञानेश्वर कोकणे, नितीन पवार, सुहास सत्वधर, सचिन बहुलेकर, सुनील झुंजार, वर्षा कोडलिंगे यांनी मनोगत व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×