Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात आर्थिक साक्षरता व जनजागृती कार्यक्रम संपन्न

महिला कर्जदारांना बचत, गुंतवणूक, कर्ज परतफेड आणि डिजिटल आर्थिक फसवणुकीपासून बचावाबाबत मार्गदर्शन

marathinews24.com

पुणे – मायक्रोफायनान्स इंडस्ट्री नेटवर्क या राष्ट्रीय स्वयं-नियामक संस्थेमार्फत कडगाव, उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात आर्थिक साक्षरता व जनजागृती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिला कर्जदारांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कौशल्याधारीत शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोहोचवा- मंत्री चंद्रकांत पाटील – सविस्तर बातमी

या कार्यक्रमात बचत योजना व गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत माहिती देण्यात आली. तसेच कर्ज घेताना आणि कर्जाची परतफेड जबाबदारीने वेळेवर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर सुरक्षेबाबत जनजागृती, विशेषतः सायबर धोके, सोशल इंजिनिअरिंग, क्रेडेन्शियल्स व उपकरणांचे संरक्षण, सुरक्षित डिजिटल सवयी आणि नेटवर्क सुरक्षेवर भर देण्याबाबत माहिती देण्यात आली. डिजिटल आर्थिक फसवणूक, पॉन्झी व मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजना, बैंक व कर्ज फसवणूक यामध्ये बनावट कर्ज अॅप्स व ओळख चोरीचा समावेश तसेच क्रेडिट किंवा डेबिट डिफॉल्टबाबत जनजागृती तसेच केवासी माहितीच्या गैरवापरामुळे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे प्रादेशिक प्रमुख श्री. देवेंद्र शाहापूरकर यांनी कळविली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×