Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

आई रागावल्याने पाच भावंडे घरातून पळाली

मांजरीतून पसार झालेली पाच भावंडे स्वारगेटमध्ये सापडली

marathinews24.com

पुणे – आई रागावत असल्याने पाच भावंडांनी पलायन केल्याची घटना मांजरी भागात घडली. पैसे संपल्यानंतर मुले स्वारगेट बसस्थानकात थांबली होती. त्यानंतर पालकांना याबाबतची माहिती मिळाली. पोलीस आणि पालकांनी मुलांना ताब्यात घेतले. मुले बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या आईने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तब्बल २ हजार ४०० किलो गांजा नष्ट – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांचे आई-वडील सिंहगड रस्ता परिसरात राहतात. ते मोलमजुरी करतात. फिर्यादी महिलेची नणंद हडपसरमधील मांजरी भागात राहते. उन्हाळी सुट्टीनिमित्त फिर्यादी महिलेच्या तीन मुली आणि दोन मुले मांजरी परिसरात आली होती. आई रागावत असल्याने मुलांनी घरातून पसार होण्याचे ठरविले. वसतिगृहात शिकून आपण मोठे होऊ, असे मुलांनी ठरविले. १९ मे रोजी मुले रिक्षाने स्वारगेट बसस्थानकात आले. स्वारगेट बसस्थानकात आल्यानंतर त्यांच्याकडील पैसे संपले होते.

भीती वाटल्याने बसस्थानकातील एका व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावरुन त्यांनी आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. स्वारगेट बस स्थानकात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुले बेपत्ता झाल्यानंतर आई-वडील मांजरी पोलीस ठाण्यात पोहाेचले होते. मुलांनी संपर्क साधल्यानंतर आई-वडील पोलिसांसह स्वारगेट बसस्थानकात पोहोचले. त्यानंतर बाल कल्याण समितीकडे पोलिसांनी नेले. समितीने मुलांकडे विचारणा केली. आई-वडिलांकडून कोणताही त्रास होत नसल्याचे मुलांनी सांगितले. त्यानंतर मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×