Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

फ्लॅटचे कुलूप तोडून २४ लाखांचा ऐवज लांबविला

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

सिंहगड रस्ता परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोकड असा २४ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली.याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गॅस देयक अद्ययावत करण्याची बतावणी करुन फसवणुकीचे प्रकार वाढले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुटुंबीय हे सिंहगड रस्त्यावरील मधुबन सोसायटीत राहायला आहेत. १२ जून रोजी महिला आणि कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. शनिवारी (१४ जून) सकाळी ते परतले. तेव्हा सदनिकेच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोने-चांदीचे दागिने, रोकड असा २४ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक किरण पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×