माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या गाडीला अपघात

रेव्ह पार्टी प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी व मुख्य सूत्रधारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाईची डॉ. नीलम गोऱ्हे यांची पोलीस महासंचालकांकडे मागणी

डॉ. नीलम गोऱ्हेंकडून विचारपूस, महामार्ग सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

marathinews24.com

पुणे – पुणे-कोल्हापूर महामार्गावर पेठ नाक्याजवळ नेर्ले गावाच्या परिसरात सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात उल्हासदादा पवार यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरूप आहेत. मात्र, त्यांच्या वाहनाला पाठीमागून आलेल्या दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने गाडीच्या मागील बाजूचे नुकसान झाले आहे. उल्हासदादा पवार हे पुण्यावरून कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत होते.

आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा – सविस्तर बातमी

घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे उल्हासदादा पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच काळजी घेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, पुणे-कोल्हापूर महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते व पुलांच्या कामांमुळे वाहनचालकांना अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दाही डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे. या कामांच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, सूचना फलक, प्रकाश व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनात काम सुरू असलेल्या ठिकाणी लावण्यात येणारे काँक्रीटचे ठोकळे, बॅरिकेड्स व सुरक्षा अडथळे हे एका सरळ रेषेत, व्यवस्थित व दृश्यमान पद्धतीने उभे करण्यात यावेत, अशी विशेष मागणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी हे ठोकळे विस्कळीत, वाकडे अथवा रस्त्यावर अनियमितपणे ठेवले जात असल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघात होण्याचा धोका वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्व बॅरिकेड्सवर रिफ्लेक्टर टेप, फ्लॅशिंग लाइट्स आणि दिशादर्शक चिन्हे लावणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महामार्गावरील सुरू असलेल्या विकासकामांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×