Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

“आई… खरंच माझं बाळ ऐकतंय!”…चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित शिबिरात उमटले असंख्य मातांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

“आई… खरंच माझं बाळ ऐकतंय!”...चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित शिबिरात उमटले असंख्य मातांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

सखी-सुखदा फाउंडेशनच्या मोफत श्रवण तपासणी शिबिरास कोथरुडमधील मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

marathinews24.com

पुणे – प्रत्येक आई आपल्या बाळाचा पहिला रडण्याचा आवाज ऐकते, पहिल्या हसण्यावर भारावून जाते आणि “आई” हा पहिला शब्द ऐकण्याचे स्वप्न मनात जपून ठेवते. पण जर हेच बाळ नीट ऐकत नसेल तर? हा विचारच कोणत्याही आईच्या काळजाचा ठोका चुकवणारा असतो.

क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम परिसंस्था उभारणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

अनेक रुग्णालयांमध्ये प्रसूतीनंतर नवजात बाळ निरोगी असल्याची खात्री करण्यासाठी काही महत्त्वाच्या तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, या तपासण्यांचा खर्च परवडत नसल्याने अनेक कुटुंबांकडून त्या पुढे ढकलल्या जातात किंवा टाळल्या जातात. कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे एखाद्या बालकाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये; आणि प्रत्येक पालकाला आपल्या बाळाच्या आरोग्याची खात्री मिळावी, या संवेदनशील भावनेतून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने आणि सखी-सुखदा फाउंडेशनच्या संचालिका स्मिता पाटील यांच्या माध्यमातून शनिवारी नवजात व लहान बाळांसाठी मोफत श्रवण तपासणी व तज्ज्ञ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास १०० बालकांची यावेळी तपासणी करण्यात आली.

शिबिरात सहभागी झालेल्या अनेक मातांनी आपल्या बाळाच्या तपासणीचा अहवाल पाहिल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला, तर काहींच्या डोळ्यांत नकळत आनंदाश्रू दाटून आले. अनेक मातांच्या ओठांवर एकच भावना उमटली—“आई… खरंच माझं बाळ ऐकतंय!” या शिबिरामुळे अनेक पालकांच्या मनातील अनामिक भीती दूर झाली, तर काहींना पुढील उपचारांची योग्य दिशा मिळाली.

“श्रवणदोषाचे वेळेत निदान झाल्यास उपचार आणि पुनर्वसन लवकर सुरू करता येते. त्यामुळे बाळाच्या बोलण्याच्या, भाषेच्या आणि बौद्धिक विकासाला योग्य दिशा मिळते. वेळेत केलेली श्रवण तपासणी अनेक मुलांचे भविष्य बदलू शकते,” असे डॉ. संवाद स्पीच-हिअरिंग क्लिनिक अँड रिसर्च फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती शिल्पा हुजूरबाजार, प्राजक्ता हुजूरबाजार, यश हुजूरबाजार यांनी सांगितले.

समाजातील दुर्बल घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या या संवेदनशील उपक्रमासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील आणि सखी-सुखदा फाउंडेशनच्या संचालिका स्मिता पाटील यांच्याप्रती उपस्थित मातांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. “राजकारणापलीकडे जाऊन नवजात बाळांच्या निरोगी भविष्यासाठी असा विचार करणारे उपक्रम समाजाला आश्वस्त करतात,” अशा भावना अनेक पालकांनी यावेळी व्यक्त केल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×